यावल प्रतिनिधी | तालुक्यातील वाघझिरा येथील एकाला मोटारसायकल चोरीच्या आरोपातून अटक केली असता त्याने आजवर १३ दुचाकींची चोरी केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.
तालुक्यातील वाघझिरा येथील फिर्यादी रवींद्र दगडू महाजन यांची २८ हजार रुपये किमतीची एम एच एकोणावीस सी एस ७२१४ ही मोटर सायकल चोरी गेल्याची २३ जून २०२१ रोजी फिर्याद दिली होती, या घटनेच्या पार्श्वभुमीवर यावल शोध कार्यास सुरूवात करीत पोलिसांनी संशयावरून गावातीलच एका संशयित आरोपी अर्जुन नांदला पावरा यास अटक केली असता त्याने पोलीस तपासात सातपुड्यातील विविध आदिवासी पाड्यावरुन १३ मोटर सायकली काढून दिले आहे.
संशयित आरोपी कडून अजूनही काही मोटरसायकली जप्त करणार असल्याचे पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांनी पत्रकारांना सांगितले. गुन्हे शोध कार्याच्या पथकात पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, सहाय्यक फौजदार मुजफ्फर खान, पोलीस अमलदार सिकंदर तडवी, असलम खान, संजय तायडे सुशील घुगे, राजेंद्र वाडे ,रोहील गणेश राहुल चौधरी, भूषण चव्हाण यांचा समावेश होता. जिल्ह्यातील नशिराबाद जळगाव अमळनेर इत्यादी विविध शहरातून चोरट्याने ह्या मोटरसायकली चोरल्या असल्याचे पोलिसांनी सांगितले जिल्ह्यातील ज्यांच्या मोटरसायकली चोरीस गेल्या अशांनी यावल पोलीस स्टेशनशी संपर्क साधून चोरीस गेलेल्या मोटर सायकलची खात्री करून घ्यावी असे आवाहन पो. नि. पाटील यांनी केले आहे.