पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारोळा नगरपरिषदेमार्फत विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ८ ते १९ नोव्हेंबेर दरम्यान मतदान जनजागृतीबाबात विविध उपक्रम राबविण्यात आले. याचाच एक भाग म्हणून तसेच यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवा यासाठी प्रशासनाच्या वतीने आज मोटारसायकल रॅली काढून जनजागृती काढण्यात आली.
याप्रसंगी डॉ.उल्हास देवरे तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी, किशोर चव्हाण मुख्याधिकारी तथा प्रशासक यांचे मार्गदर्शनाखाली पारोळा नगरपरिषदेमार्फत मतदान जनजागृतीसाठी भव्य मोटरसायकलला हिरवी झंडी दाखवून सुरूवात करण्यात आली. याप्रसंगी या रॅलीत यामिनी जटे प्रशासन अधिकारी, साक्षी मराठे नगररचना सहाय्यक, चंद्रकांत महाजन सहाय्यक प्रकल्प अधिकारी, भूषण महाजन शहर तांत्रिक कक्ष अधिकारी, शुभम कंखरे शहर समन्वयक, अक्षय सोनवणे, राहुल प्रजापती, किशोर चौधरी, विश्वास पाटील, सचिन चौधरी, जितेंद्र चौधरी, विशाल गायकवाड, गणेश माळी, सतिष चौधरी, कैलास वानखेडे, ज्ञानेश्वर रिजल हे मतदान अधिकारी तर आरोग्य विभागातील आरोग्य निरीक्षक श्री दिलीप चौधरी, आकाश कंडारे, मोतीलाल बळीराम पाटील, प्रदीप रिले, शंकर करोसिया, अलताफ शेख, निर्भय मोरे आदी उपस्थित होते.