Home क्राईम मुक्ताईनगर कॉलनीतून मोटारसायकल लंपास

मुक्ताईनगर कॉलनीतून मोटारसायकल लंपास

0
25

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील मुक्ताईनगर कॉलनी परिसरातून एकाची मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, मुक्ताईनगर कॉलनीतील रहिवासी राजेंद्रकुमार रामकिसन सोनवणे  (वय-५४) यांनी नेहमीप्रमाणे त्यांची (एम.एच.१९ के ०६४१) या क्रमांकाची दुचाकी घराच्या कंपाउंडमध्ये उभे केली होती. ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास घरासमोर उभी दुचाकी दिसून आली नाही. दोन दिवस सर्वत्र शोध घेतला मात्र त्यानंतरही दुचाकी मिळून न आल्याने चोरीची खात्री झाल्यावर  अखेर सोनवणेंनी जिल्हा पेठ पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरून गुरुवारी जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे पुढील तपास पोलिस नाईक प्रदीप पाटील हे करीत आहेत.

 

 


Protected Content

Play sound