महिला दिनानिमित्त पोलीस दलातर्फे मोटरसायकल हेल्मेट रॅली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने जळगाव जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने महिला दिन साजरा करण्यात आला. या अनुषंगाने शुक्रवार ८ मार्च रोजी सकाळी १० वाजता शहर वाहतूक शाखा येथून महिलांसाठी ३ किलोमीटर मोटरसायकल हेल्मेट रॅलीचे आयोजन करण्यात आले.

आयोजित रॅली शहर वाहतूक शाखेपासून सुरुवात करण्यात आली, नंतर कोर्ट नेहरू चौक, टावर चौक, चित्रा चौक मार्गे पुन्हा शहर वाहतूक कार्यालयात दाखल होऊन हेल्मेट रॅलीचे समारोप करण्यात आला. या रॅलीमध्ये जळगाव जिल्हा पोलीस दलातील महिला अधिकारी, अंमलदार, पोलीस कुटुंबीय व जळगाव शहरातील महिला महिलांनी वेगवेगळ्या पारंपारिक वेशभूषा करून सहभाग नोंदविला. या रॅलीला पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी हिरवी झेंडे दाखवून राहिलेल्या सुरुवात करण्यात आली. या रॅलीत बेटी बचाव बेटी पढाव, श्री शक्तीचा सन्मान, मुलगी शिकवा देश घडवा, कौटुंबिक छळ हा अक्षम्य गुन्हा असे वेगवेगळे प्रकारचे महिला सबलीकरण व सशक्तिकरण्याचा संदेश देण्यात आला.

याप्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी, संदीप गावित गृह विभागाचे पोलीस उपअधीक्षक प्रमोद पवार, यांच्यासह पोलीस विभागातील वेगवेगळ्या शाखेचे अधिकारी अंमलदार व कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content