नियमित करभरूनही मोतीराम नागरवासीय मूलभूत सुविधांपासून वंचित (व्हिडीओ )

WhatsApp Image 2019 06 02 at 5.43.09 PM

जळगाव (प्रतिनिधी) सावखेडा गट नं . १६०/५ मधील मोतीराम नगर भागात गटारी पाणी रस्ते विजेसारखी मूलभूत सुविधा देखील उपलब्ध नाहीत. नियमित सावखेडा ग्रामपंचायतीचे कर भरूनही मूलभूत सुविधा मिळत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.या परिसरात रस्ते, पाणी, गटारीच्या सुविधा देण्याची मागणी त्यांनी केली आहे.

सावखेडा शिवार मोतीराम नगरातील नागरिकांना सावखेडा ग्राम पंचायतीकडून कोणतीही सुविधा पुरवली जात नसल्याने रहिवासी वर मनस्ताप करण्याची वेळ येते आहे. येथील रहिवास्यांना सुविधा मिळत नसल्याने त्यांनी एकत्रित येवुन लोकसह्भातून आजपर्यंत १ ते २ लाख रुपये गोळा करून २००० फूटा पर्यंत पाणीसाठी पाइप लाईन स्वखर्चाने टाकून घेतली व दुसरा उपाय म्हणून खुल्या भूखंडावरील विहिरीतीळ गाळ काढून या विहिरीवर जाळी बसविण्यात आली असून या भूखंडावर वृक्ष रोपण करून त्ये ठिकाणी उद्यान तयार करण्यात येत आहे. रसत्यावर अंधार राहत असल्याने रहिवास्यांनी स्वखर्चाने पथदिवे बसविले.

या नागरिकांनी मांडली व्यथा
‘लाईव्ह ट्रेंडशी ‘ बोलतांना भास्कर पाटील, मुकेश बारी, चेतन चौधरी, सुरेश परिष्कर, राकेश चौधरी, हसन तडवी, निलेश अहिरे, राजेश सोनवणे, आसिफ जमादार, राजेंद्र देवरे, गोविंद सोनार, महेंद्र ढोने, संदेश गुंजाळ, योगेश पाटील पाटील, विकास पाटील, विनायक चतुर, नंदलाल प्रजापती, अक्षय बडगुजर, व रहिवासी यांनी आपली व्यथा केली. सावखेडा ब्रु. ची ग्रामपंचायतीने याकडे मोतीराम नगरातील रहिवास्यांची समस्या लवकरात लवकर सोडवावी अशी मागणी केली आहे.

पहा मोतीराम नगरवासीयांची व्यथा 

 

Add Comment

Protected Content