Home क्राईम अल्पवयीन मुलीसह आईचा विनयभंग; एकाला अटक

अल्पवयीन मुलीसह आईचा विनयभंग; एकाला अटक

0
223


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील शिरसोली येथे राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला अश्लिल हावभाव केला. याचा जाब विचारला असताना मुलीच्या आईवडीलांना शिवीगाळ करत मारहाण करून विनयभंग केल्याची घटना रविवारी २७ जुलै रोजी सकाळी ९ वाजता समोर आली आहे. याबाबत सोमवारी दुपारी अडीच वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. भूषण सोपान पाटील रा. शिरसोली ता.जळगाव असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.

जळगाव तालुक्यातील शिरसोली गावात १२ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या आईवडीलांसह वास्तव्याला आहे. रविवारी २७ जुलै रोजी सकाळी ९ वाजता पिडीत मुलगी ही क्लासला जात असतांना संशयित आरोपी भूषण पाटील याने पिडीत मुलीला अश्लिल हावभाव केला. याबाबत पिडीत मुलीच्या आई व वडीलांनी याचा जाब संशयित आरोपी भूषण पाटील याला विचारला. याचा राग आल्याने त्याने पिडीत मुलीच्या आईवडीलांना शिवीगाळ करत मारहाण केली, व महिलेचा हात पकडून विनयभंग केला. हा प्रकार घडल्यानंतर पिडीत मुलीच्या आईने एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात संशयित आरोपी भूषण पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ किरण चौधरी हे करीत आहे.


Protected Content

Play sound