Home क्राईम दोन लाखांची मागणी करत विवाहितेचा सासरी छळ

दोन लाखांची मागणी करत विवाहितेचा सासरी छळ


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील भादली खुर्द येथील माहेर असलेल्या विवाहितेला व्यवसाय करण्यासाठी विवाहितेने माहेरुन दोन लाख रुपये आणावे अशी मागणी करत सासरी गुजरात राज्यातील उधना येथे मारहाण करत छळ केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात सासरच्या मंडळींसह लग्न जुळविणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील भादली खुर्द येथील माहेर असलेल्या संगिताबाई राहुल पाटील (वय ४०) यांचा विवाह गुजरात राज्यातील उधना येथील राहुल हंसराज पाटील यांच्यासोबत झाला आहे. लग्न झाल्यानंतर सासरच्या मंडळींनी विवाहितेला व्यवसाय करण्यासाठी माहेरुन दोन लाख रुपये आणावे अशी मागणी केली. परंतु त्यांची मागणी पुर्ण न केल्यामुळे सासरच्यांकडून विवाहितेला शिवीगाळ करीत मारहाण करुन तीचा छळ केला जात होता. हा छळ असह्य झाल्याने विवाहिता माहेरी निघून आल्या. त्यांनी सोमवारी २९ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता जळगाव तालुका पोलिसात तक्रार दिली. विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरुन विवाहितेचा पती राहुल हंसराज पाटील, सासू प्रमिला हंसराज पाटील, सासरे हंसराज पाटील व लग्न जुळविणारे राठोड दादा, सर्व रा.उधना जि. सुरत, गुजरात यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ दीपक चौधरी हे करीत आहे.


Protected Content

Play sound