कारण नसतांना भावासह आई व बहिणीला लोखंडी रॉडने मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी येथे आईला शिवीगाळ केल्याचा जाब विचार एका भावाने दुसऱ्या भावासह आई व बहिणीला शिवीगाळ करत लोखंडी रॉडने मारहाण करून दुखापत केल्याची घटना रविवारी ९ जून रोजी दुपारी १२.३० वाजता घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात सायंकाळी ७ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, महेंद्र जयवंत बैसाणे वय ४३ रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. रविवार ९ जून रोजी दुपारी १२.३० वाजता महेंद्र बैसाणे यांचा भाऊ श्याम जयवंत बैसाणे हा त्याची आईला शिवीगाळ केली. याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या महेंद्र बैसाणे याच्यासह त्यांची आई व बहिण यांना लोखंडी रॉडने मारहाण करून दुखापत केली. याप्रकरणी सायंकाळी ७ वाजता एमआयडीसी पोलीसात तक्रार देण्यात आली. त्यानुसार मारहाण करणारे श्याम जयवंत बैसाणे याच्या विरोधात पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक हेमंत जाधव हे करीत आहे.

Protected Content