देशात पुन्हा साडेतीन लाखांपेक्षा जास्त रूग्ण; मृतांचा आकडाही चिंताजनक

 

 

नवी दिल्ली वृत्तसंस्था । प्रयत्नांची शर्थ करूनही देशातील कोरोना रूग्णांची संख्या कमी होत नसल्याचे आज पुन्हा दिसून आले आहे. गत चोवीस तासांमध्ये देशात ३.५२ लाख नागरिकांना कोरानाची बाधा झाली असून २८०० रूणांचा मृत्यू झाला आहे.

 

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत कोरोनाच्या नव्या ३ लाख ५२ हजार ९९१ रुग्णांची नोंद झाली आहे. तर २ हजार ८१२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. २४ तासांत २ लाख १९ हजार २७२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

 

देशात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे चिंता वाढली आहे. देशात आतापर्यंत १ लाख ९५ हजार १२३ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. सध्या देशात २८ लाखांहून अधिक सक्रिय रुग्ण आहेत. तर आतापर्यंत १ कोटी ७३ लाख १३ हजार १६३ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. आतापर्यंत १४ कोटी १९ लाख ११ हजार २२३ कोरोनाचे लसीकरण झाले आहे.

Protected Content