हाथरस-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | हाथरस येथे भोले बाबांच्या सत्संगाच्या वेळी चेंगराचेंगरी झाली. यामध्ये 50 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. दीडशेहून अधिक भाविक जखमी झाले आहेत. यातील अनेकांची प्रकृती गंभीर आहे. मृतांचा आकडा वाढू शकतो. मुख्य सचिव मनोज सिंह आणि डीजीपी प्रशांत कुमार घटनास्थळी रवाना झाले आहेत.
एटा सीएमओ उमेश त्रिपाठी यांनी सांगितले की, हाथरसमधून आतापर्यंत 27 मृतदेह आले आहेत. यामध्ये 25 महिला आणि 2 पुरुष आहेत. उर्वरित मृतदेह सीएचसी सिकंदरराव येथे आहेत. तेथे दीडशेहून अधिक लोक दाखल आहेत. मृतदेहांचा पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यानंतर पोस्टमॉर्टम केले जाईल. रतीभानपूर येथे ही घटना घडली. अपघातानंतर परिस्थिती भयावह बनली. कसेबसे जखमी आणि मृतांना बस-तंबूत चढवून जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. सीएम योगी यांनी एडीजी आग्रा आणि कमिशनरना अलिगढला पोहोचण्याचे आदेश दिले आहेत. डीएम आणि एसपी घटनास्थळी पोहोचले आहेत. सत्संगाला 15 हजारांहून अधिक लोक आले होते.