भुसावळ – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली असून न्याय मिळावा यासाठी घटनेच्या निषेधार्थ कोळी समाज बांधवांच्या वतीने आज भुसावळ शहरामध्ये मोर्चा काढण्यात आला.
यावल तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर 26 जानेवारी रोजी तीन नराधमांनी अत्याचार केला. या तिन्ही नराधमाला फाशीची शिक्षा देण्यात यावी, हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालविण्यात यावे, या मागणीसाठी आज कोळी समाज बांधवांच्या वतीने भुसावळ शहरातील प्रभात हॉल ते प्रांत कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. याप्रकरणी प्रांताधिकारी रामसिंग सुलाने यांना निवेदन देण्यात आले. या मोर्चामध्ये महिलांनीही मोठ्या संख्येत सहभाग नोंदवला होता.