यावल, प्रतिनिधी । तालुक्याच्या सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी कुशीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेले मोर मध्यम प्रकल्प यंदाच्या होत असलेल्या दमदार पावसामुळे पहिल्यादांच जुन आणि जुलैच्या पावसात हिंगोणा तालुका यावल जवळील मोर मध्यम प्रकल्प ६३. २६ टक्केच्या वर भरले आहे. तेव्हा या प्रकल्पाच्या चार गेट पैकी दोन गेट तीन दिवसांपासुन ५ सेंटीमिटरने उघडण्यात आले आहे तर त्यातुन मोर नदीपात्रात दररोज ५०० दलघमी पाण्याच्या विर्सग होत आहे.
यावल तालुक्यातील हिंगोणा गावाच्या पुढे उत्तर दिशेला सातपुड्याच्या कुशीत असलेल्या मोर मध्यम प्रकल्प असून या प्रकल्पाची एकुण क्षमता ९.५०५ दलघमी इतकी आहे. तर या प्रकल्पाचे पाणलोट क्षेत्र हे सातपुड्यातील असुन सद्या सातपुड्याच्या कुशीत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस सुरू आहे. परिणामी सदरील धरणात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा असुन यंदा प्रथमच जुन महिन्यात प्रकल्प हे ६३.२६ टक्के भरले आहे. सद्या ६.५८१ दलघमी जलसाठा धरणात झाला आहे. त्यातचं अजुन संपुर्ण पावसाळा बाकी आहे म्हणुन गेल्या तीन दिवसांपासुन या मोर मध्यम प्रकल्पातील चार पैकी एक गेट ५ सेंटीमिटरनेे उघडण्यात आलेे आहेत. यातून दररोज मोर नदी पात्रात ०.२४० दलघमी पाण्याचा विर्सग सुरू आहे. सदरील पाणी फैजपूर, आमोदा, अंजाळे कडून तापी नदी पात्रात येत आहे. तर या विर्सगामुळे परिसरातीत शेत विहिरीच्या पाण्यात देखील लक्षणीय वाढ होण्यास मदत होणार आहे.
कालव्यात पाणी सोडून
या मध्यम प्रकल्पाला एक उजवा कालवा आहे व या कालव्यास हिंगोणा मायनर १ व २ अशा वितरिका असून उपवितरिका देखील आहे. या जलप्रकल्पात अजुन साठा वाढल्यास प्रसंगी कालव्यातुन देखील विर्सग करण्यात येईल असे मोर मध्यम प्रकल्पच्या सुंत्राकडुन माहीती देण्यात आली आहे.