जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । शहरातील मू.जे. महाविद्यालयात योग शिक्षक सुनील गुरव हे ३६ वर्षाच्या प्रदिर्घ सेवेतून नुकतेच सेवानिवृत्त झाले असून आज मू.जे.महाविद्यालयात प्राचार्य डॉ. स.ना.भारंबे यांच्या हस्ते शाल , श्रीफळ , पुष्पगुच्छ व ज्ञानेश्वर महाराजांची मुर्ती देऊन सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक , रजिस्ट्रार , सर्व शिक्षकेतर कर्मचारी , कुटुंबातील सदस्य व गणानाम मित्रपरिवार उपस्थित होता. तद्नंतर गणणाम परिवाराच्या प्रथेनुसार श्री.व सौ. गुरव यांना फेटा घालून महाविद्यालयापासून त्यांचे श्रीधर नगर येथील घरापर्यंत वाजत-गाजत नेऊन मित्रमंडळी व स्नेहींनी मनोगत व्यक्त केले.