‘लाडकी बहिण’ योजनेतील दरमहा पैसे वाढणार : मुख्यमंत्री

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | लाडकी बहिण योजना बंद पडणार असल्याची अफवा विरोधक पसरवत असले तरी असे होणार नसून उलट या योजनेतील पैसे वाढणार असल्याची महत्वाची घोषणा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. ते मुक्ताईनगरातील सभेत बोलत होते.

आज मुक्ताईनगरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले. यात बोलतांना शिंदे म्हणाले की, लाडकी बहिण योजना बंद करण्याचे प्रयत्न विरोधक करत आहेत. यासाठी ते कोर्टात गेले आहेत. मात्र असे काहीही होणार नाही. आमचे सरकार पुन्हा आल्यावर लाडकी बहिण योजनेचे पैसे दरमहा हे दीड हजारांवरून दोन वा अडीच नव्हे तर तीन हजार रूपये देखील होणार असल्याचे ते म्हणाले.

दरम्यान, आजच्या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर कडाडून हल्लाबोल करतांनाच महायुतीच्या सरकारच्या कामांबाबत माहिती दिली. तर त्यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कामाचे कौतुक करतांनाच ते यंदा पन्नास हजार मतांपेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येतील असा आशावाद देखील व्यक्त केला. महायुतीचे उमेदवार म्हणून आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन देखील त्यांनी केले.

Protected Content