केरळात मान्सून दाखल

मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली असून लवकरच मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

श्रीलंकेच्या वेशीवर काही दिवस मान्सूनचा मुक्काम वाढला होता पण आता मान्सून केरळात दाखल झाला असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. पुढच्या सात दिवसात म्हणजे 5 जून पर्यंत महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन होवू शकते असा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. 27 जून पर्यंत केरळात दाखल होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. पण यावर्षी मान्सूनचे लवकर आगमन झाले आहे.

केरळात मान्सून दाखल झाल्यावर सात दिवसांत मान्सून महाराष्ट्रात दाखल होत असतो. महाराष्ट्रातील तळकोकणात पहिल्यांदा मान्सून दाखल होत असतो. त्यानंतर तीन ते चार दिवसांत मुंबईमध्ये मान्सून दाखल होत असतो. 10 ते 11 जूनच्या सुमारास साधारण मुंबई आणि पुण्यात दाखल होत असतो पण यावर्षी 7 ते 8 जूनला पुण्यात आणि मुंबईत मान्सून दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

Protected Content