तळवेल अन हतनूर येथे विविध विकासकामांचे सोमवारी लोकार्पण

raksha khadse

भुसावळ, प्रतिनिधी | तालुक्यातील तळवेल व हतनूर गटात १५ कोटी ५२ लाखांचे रस्ते सभागृह व इतर कामे मंजूर झाली असून ही कामे माजीमंत्री एकनाथराव खडसे यांच्या मार्गदर्शनाने खासदार रक्षाताई खडसे यांनी ७२ लाख व आमदार संजय सावकारे यांनी १४ कोटी ८० लाख ही कामे मंजूर केली आहे. उद्या दिनांक १९ ऑगस्ट २०१९ रोजी सकाळी ९.०० ते संध्याकाळी ८.०० दरम्यान या कामांच्या उद्घाटन व लोकार्पण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

 

या कार्यक्रमाला सभापती व उपसभापती, जि.प. सदस्य,प. स. सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, बुथ प्रमुख शक्ती केंद्रप्रमुख व सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन तालुकाध्यक्ष सुधाकर जावळे, तालुका सरचिटणीस भालचंद्र पाटील व नारायण कोळी यांनी केले आहे.

Protected Content