भुसावळ, प्रतिनिधी | महाविकास आघाडी व जनाधार विकास पार्टीतर्फे सोमवार ६ जानेवारी रोजी महात्मा गांधी पुतळा यावल रोड भुसावळ येथे शहरातील विविध समस्या विरोधात रस्ता रोको करण्यात येणार आहे.
महाविकास आघाडी व जनाधार विकास पार्टीतर्फे भुसावळ नगरपालिकेत भाजपाची सत्ता आल्यापासून भुसावळ शहर अनेक समस्यांनीग्रस्त झाल्याने शहराचे वैभव हरवलेले आहे असा आरोप केला. भुसावळला ३० वर्षे मागे घेऊन गेली. लोकांना रस्ते, पाणी, आरोग्य अश्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या भोंगळ कारभाराच्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी दुपारी ठीक २.०० वा आंनदोलन करण्यात येणार आहे तरी सर्व भुसावळवासीयांनी शहर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी २.०० वाजता या गांधी पुतळा समोर हजर राहावे असे आवाहन माजी आमदार संतोष चौधरी यांनी केले आहे.