पाचोरा प्रतिनिधी । शेतात सऱ्या पाडण्याचे काम सुरू असतांना नगरदेवळा ता. पाचोरा गावातीलच दोन जण शेतात येऊन महिलेसह तिच्या पतीला जातीवाचक शिवीगाळ करीत महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली असून याबाबत पाचोरा पोलिसात दोन जणांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांकडून प्राप्त माहिती अशी की, नगरदेवळा ता. पाचोरा येथील महेंद्र दिलीप मोरे हा भैय्या चौधरी यांचे आउत घेऊन पंढरी शेठ मारवाडी यांचे शेतात कपाशी लागवडीसाठी सऱ्या पाडण्याचे काम करीत असतांना महेंद्र मोरे यांची पत्नी देखील बरोबर होती. यावेळी गावातील अब्दुल गणी शेख कमृद्दिन व हबीब खान हनिफ खान हे दोघेजण शेतात येऊन ही शेती तुम्ही का करतात ? ही शेती केली तर तुम्हाला जिवे ठार मारू.. अशी धमकी देत अर्वाच्यपणे जातीवाचक शिवीगाळ केली व महिलेस लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करीत मारहाण केली. याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिसात अब्दुल गणी शेख कमृद्दिन व हबीब खान हनिफ खान दोघे रा. नगरदेवळा ता. पाचोरा यांचे विरुद्ध जातीवाचक शिवीगाळ करणे व महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.