अश्लिल इशारे करून महिलेचा विनयभंग; दोन जणांवर गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या महिलेला अश्लिल इशारे करून विनयभंग केल्याची घटना गुरूवार ६ जून रोजी सकाळी १०.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी सायंकाळी ७ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, जळगाव तालुक्यातील गावातील एका भागात ३८ वर्षीय महिला वास्तव्याला आहे. गावात राहणारे जाकीर बिराम पिंजारी याने गुरूवारी ६ जून रोजी सकाळी १०.३० वाजता महिलेला अश्लिल इशारे करून विनयभंग केला. याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या महिलेला जाकीर पिंजारी व त्याची पत्नी शबनम जाकीर पिंजारी या दोघांनी शिवीगाळ करत मारहाण केली. याप्रकरणी महिलेने सायंकाळी ७ वाजता एमआयडीसी पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार जाकीर पिंजारी व त्याची पत्नी शबनम जाकीर पिंजारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक फौजदार अधिकार पाटील हे करीत आहे.

Protected Content