Home क्राईम “माझ्याशी का बोलत नाही” असे म्हणत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

“माझ्याशी का बोलत नाही” असे म्हणत अल्पवयीन मुलीचा विनयभंग


पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । माझ्याशी का बोलत नाही असे म्हणत सतरा वर्षी अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार जामनेर तालुक्यातील एका गावात समोर आला आहे. या संदर्भात पहूर पोलीस ठाण्यात सोमवारी १४ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजता एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील एका गावात १७ वर्षी अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. रविवारी १३  ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.३० वाजता अल्पवयीन मुलगी ही एकटी असतांना घरी असताना गावात राहणारा आकाश संपत साबळे हा घरी आला. त्याने तिचा पाठलाग करून घरात प्रवेश केला, “तू माझ्याशी का बोलत नाही, मी तुझा फोटो व्हाट्सअप डीपीवर ठेवेल, तुला काय करायचे आहे ते कर” असे म्हणून तिचा विनयभंग केला. घाबरलेल्या अवस्थेत पीडित मुलगी ही घरात जाऊन घडलेली घटना सांगितली. त्यानुसार पीडित मुलीच्या नातेवाईकांनी पहूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार सोमवारी १४ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजता संशयित आरोपी आकाश संपत साबळे यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल गर्ज करीत आहे.


Protected Content

Play sound