यावल प्रतिनिधी । तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या विधवा महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, यावल तालुक्यातील ४० वर्षीय महिला आपल्या परिवारासह राहतात. मंगळवार २३ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता महिला घरात असतांना गावातील संशयित आरोपी फिरोज हुसेन पिंजारी हा महिलेच्या घरात माचिस मागण्याच्या उद्देशाने घरात घुसून, मी तुझ्यावर प्रेम करतो. तुझे पती वारले आहे असे बोलून अंगलट केले. महिलेने विरोध केला असता फिरोज पिंजारी याने अश्लिल शिवीगाळ करून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात संशयित आरोपी फिरोज पिंजारी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार अजिज शेख करीत आहे.