जळगाव प्रतिनिधी । एमआयडीसी परिसरात चहाची विक्री करणाऱ्या ४५ वर्षीय विवाहितेचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमआयडीसी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसी परिसरात एका ठिकाणी चहाची विक्री करण्याचे काम ४५ वर्षीय महिला करते. दरम्यान या चहाच्या टपरीवर रविवार २६ सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास अंकुश साईदास चव्हाण रा. समतानगर जळगाव हा विनापरवानगी दुकानात घुसून महिलेला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून अश्लिल शिवीगाळ केली व तिचा विनयभंग केला. याप्रकरणी महिलेने एमआयडीसी पोलिस ठाण्यात संशयित आरोपी अंकुश चव्हाण यांच्याविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल जितेंद्र राजपूत करीत आहे.