Home क्राईम डिकसाई गावात तरुणीचा विनयभंग

डिकसाई गावात तरुणीचा विनयभंग


 

जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील डिकसाई गावात एका तरुणीचा विनयभंग झाल्याची घटना आज (मंगळवार) सकाळी घडली आहे. याप्रकरणी गावातीलच युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

या संदर्भात अधिक असे की, डिकसाई गावातील एका २३ वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याची घटना मंगळवारी सकाळी ८.३० वाजता घडली. गावातच राहणाऱ्या सुर्यकांत नारायण पाटील (वय ४०) याने तरुणीच्या घरात घुसून विनयंभग केला. पिडीत तरुणीच्या फिर्यादीवरुन तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुर्यकांतला अटक करण्यात आली असून पुढील तपास सतीष हळणोर तपास करीत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound