जळगाव प्रतिनिधी । शहरातील एका भागात राहणारी महिलेला शिवीगाळ करून मारहाण करून विनयभंग केल्याची घटना बुधवार २९ डिसेंबर रोजी दुपारी घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, शहरातील एका भागातील परिसरात ४८ वर्षीय महिला आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. बुधवारी २९ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास महिलेच्या मुलाला घरासमोरील राहणारा मुलगा भैरव राणे हा ओढताण करत असल्याचे पाहून महिला सोडविण्यासाठी गेली. त्यावेळी भैरव राणे याने महिलेला अश्लिल शिवीगाळ करून विनयभंग केला. तर प्रमिला भगवान राणे, उज्जवला प्रदीप राणे आणि प्रदीप पाटील यानी महिलेसह तिच्या मुलाला बेदम मारहाण केली. याप्रकरणी महिलेने चौघांविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सुनिल सोनार करीत आहे.



