अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील हिंगोणे गावात राहणाऱ्या पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीच्या छेडखानीवरून वाद निर्माण होवून मुलीच्या आईवडीलांना लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली. याप्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील हिंगोणे गावात १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी वास्तव्याला आहे. १० ऑक्टोबर रोजी पिडीत मुलगी ही घरात एकटी असतांना संशसित आरोपी हितेश मिलींद साळुंखे हा घरात जबरीने घसुन मुलीची छेडखानी केली. त्यानंतर ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता या वादातून हितेश मिलींद साळुंखे, मिलींद साळुंखे, मनिषा मिलींद साळुंखे, ललिता फकिरा थोरात, सिमा पवार, अशोक छगन थोरात, जिजाबाई अशोक थोरात सर्व राहणार हिंगोणे ता. अमळनेर यांनी पिडीत मुलीच्या आई व वडील यांनी लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली आहे. याप्रकरणी पिडीत मुलीच्या वडीलांनी मारवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद पवार हे करीत आहे.




