राम मंदिराबाबत मोदींचा उद्धव ठाकरेंवर निशाणा?

Narendra Modi

 

नाशिक (वृत्तसंस्था) राम मंदिराबाबत काहींजणांकडून सुरू असलेला वाचाळपणा थांबवावा, सुप्रीम कोर्टावर विश्वास ठेवा. प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असताना वक्तव्य करणारे कुठून येत आहेत. सर्व प्रकरणात अडथळा का आणला जात आहे ?. आपला सर्वोच्च न्यायालय, राज्यघटनेवर, न्याय प्रक्रियेवर विश्वास विश्वास ठेवा, हात जोडून मी तुम्हाला विनंती करतो, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशकात अप्रत्यक्षरित्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना टोला लगावल्याची चर्चा आहे.

 

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर आयोजित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या समारोपाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हजेरी लावली . नरेंद्र मोदींच्या सभेनिमित्त भाजपाचे दिग्गज नेते नाशिकमध्ये उपस्थित होते. यावेळी नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांना संधी देण्याचे आवाहन केले. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही नरेंद्र मोदी यांनी टीका केली. मतांसाठी शरद पवारांकडून काश्मीर मुद्द्यावर अपप्रचार केले जाणे दुर्देवी असल्याचे नरेंद्र मोदींनी म्हटले आहे. काँग्रेस गोंधळले आहे हे समजू शकतो. पण शरद पवार यांच्यासारखा अनुभवी नेता काही मतांसाठी चुकीचे विधान करत असेल तर फार दु:ख होते,असेही नरेंद्र मोदींनी म्हटले.

Protected Content