Home राजकीय दिल्लीत आज मोदी-शहांची बैठक ; सत्तास्थापनेचा तोडगा निघण्याची शक्यता

दिल्लीत आज मोदी-शहांची बैठक ; सत्तास्थापनेचा तोडगा निघण्याची शक्यता


Prime Minister Narendra Modi and BJP national president Amit Shah 2 770x433
 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्तास्थापनेसाठी आता भाजपमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर आज 6 नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यात चर्चा होण्याची शक्यता आहे.

 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्री परिषदेची आज संध्याकाळी 6 वाजता बैठक होणार आहे. या बैठकीचे आयोजन मोदी यांच्या निवासस्थानी करण्यात आले आहे. या बैठकीत महाराष्ट्रात सुरू असलेल्या सत्ता संघर्षावर चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, तत्पूर्वी मंगळवारी रात्री मुख्यमंत्र्यांनी आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत यांची देखील भेट घेत, मध्यस्ती करण्याची विनंती केली होती.


Protected Content

Play sound