धरणगाव(प्रतिनिधी) आधुनिक काळात महिलांनी प्रत्येक क्षेत्रात सक्षमता दाखविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन नागपूरच्या मेघें ग्रुपच्या सर्वेसर्वा श्रीमती आभा मेघें यांनी रणरागिणी पुरस्कार वितरण प्रसंगी व्यक्त केले.
शहरातील नामवंत शाळा लिटिल ब्लॉसम स्कूलने महिला दिन रणरागिणी पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी दीपप्रज्वलन नंतर आभा मेघें (नागपूर-मेघें ग्रुप),उमा मॅडम (चाळीसगाव-सामाजिक कार्यकर्त्या),माधुरी अत्तरदे (जि. प.सदस्य-जळगाव),डी. जी.पाटील (प्रदेश सचिव-काँग्रेस), ज्ञानेश्वर महाजन(माजी नगराध्यक्ष), कैलास माळी सर(गटनेता-न.पा.),डॉ. कुलकर्णी(अध्यक्ष-प.रा.सोसायटी),बी.एन.चौधरी सर(जेष्ठ साहित्यिक),डॉ. संजीव सोनवणे(जेष्ठ कवी),सर्व महिला नगरसेविका,पत्रकार आदी मान्यवरांचा संस्थेचे चेअरमन दीपक जाधव,प्राचार्य ज्योती जाधव,संचालकअग्निहोत्री मॅडम,तसणीम मॅडम,शिक्षक पालक संघाचे ए. के.पाटील,गजानन साठे,दिनेश मेहेर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी समाजात विशेष कार्य करू आदर्श निर्माण केल्याबद्दल लक्ष्मीबाई जोशी,नामा बोहरी,वैशाली गलापुरे, डॉ. डहाळे मॅडम,विमल सोनार,कल्पिता पाटील,प्रणिता कंखरे, पुष्पाताई महाजन,उषा वाघ,पाकीजा पटेल,आरती सूर्यवंशी,अनिता पाटील आदी महिलांचा साडी चोळी देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी इंग्लिश मिडीयम शाळेच्या मुलांनी विविध कार्यक्रम सादर करून उपस्थिठांची दाद मिळविली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिभा चौधरी मॅडम यांनी तर आभार मंजुषा मॅडम यांनी केले.यावेळी शाळेच्या सर्व शिक्षक,शिक्षिका,इतर कर्मचारी आदींनी सहकार्य केले..