जळगाव प्रतिनिधी । वाहतूक माहिला पोलीस कर्मचारी ह्या मोपेड गाडीने कामावर जात असतांना अज्ञान वाहनधारकाने कट दिल्याने महिला कर्मचारी जखमी झाल्या असून त्याच्यावर जिल्हा सामान्य रूग्णालयात प्राथमोपचार करण्यात आले. याबाबत जिल्हा पेठ पोलीसात अज्ञात वाहनचालकाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी की, वाहतूक शाखेच्या महिला पोलीस कर्मचारी अलका शांताराम वराडे (वय-33) रा. पांडूरंग नगर, खोटे नगर ह्या खोटेनगरहून शहरात मोपेड गाडी क्रमांक (एमएच 19 डीडी 9803) ने कामावर जात असतांना बहिणाबाई गार्डनजवळील दिपीका हॉस्पिटल जवळ अज्ञानवाहनधारकोन बजाज डिस्कव्हर क्रमांक (एमएच 19 बीएच 7047) ने कट दिला. यात महिला पोलीस कर्मचारी या रोडवर पडून घसरल्याने त्यांच्या उजव्या पायाला आणि हाताला लागून गंभीर जखमी झाल्या. दरम्यान याच वेळी अर्वाच्य भाषेत महिलेशी वाद घालून अज्ञात वाहनधारकाने पळ काढला. जखमी झालेल्या महिला पोलीसांनी तातडीने जिल्हा सामन्य रूग्णालयात प्राथमोचार घेतले. या घटनेबाबत जिल्हापेठ पोलीसात अज्ञात वाहनधारकाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.