भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर भुसावळ रेल्वे स्थानकावर जीआरपीएफच्या वतीने मॉक ड्रील करण्यात आले. यात जळगाव जिल्हा एसआरपी पथक, डॉग स्कॉट, अग्निशमन दल, रूग्णवाहिका यांच्या मदतीने मॉक ड्रील करण्यात आले. यावेळी आरपीएफचे मीना, जीआरपीएफचे विजय घागडे यांच्यासह आदी अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.
भुसावळ रेल्वे स्थानकावर ६ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने प्रवाशांची नागपूरला जाण्यासाठी समाज बांधवांची मोठी प्रमाणावर गर्दी राहणार आहे. कोणताही अनुचित प्रकार होणार नाही या अनुषंगाने बंदोबस्त व सुरक्षेच्या अनुषंगाने भुसावळ जीआरपीएफच्या वतीने रविवारी ३ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता मॉक ड्रील आणि कडक सुरक्षा करण्यात आले. यात जळगाव जिल्हा एसआरपी पथक, डॉग स्कॉट, अग्निशमन दल, रूग्णवाहिका यांच्या मदतीने मॉक ड्रील करण्यात आले. यावेळी आरपीएफचे मीना, जीआरपीएफचे विजय घागडे यांच्यासह आदी अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.