
रावेर (प्रतिनिधी) मोबाईल चोरून पसार होण्याच्या तयारीत असणाऱ्या एका आरोपीला गावकरी व पोलिसांनी रंगेहाथ पकडल्याची घटना पाल येथे नुकतीच घडली आहे.
याबाबत वृत्त असे की, दि 16 रोजी सै.जफर सै.मजर हा मोबाइल विक्रीसाठी पाल येथे गेला होता. आरोपी दिलीप बारोली (रा. झिरण्या, मध्य प्रदेश) हा मोबाईल घेण्याच्या बहाण्याने आला. परंतू चलाखीने 3 हजार 600 रुपये कीमतीचा आयटेल कंपनीचा मोबाइल घेऊन पसार होण्याचा प्रयत्न करू लागला. परंतू तेवढ्यात मोबाईल विक्री करणाऱ्यांच्या लक्षात ही गोष्ट येताच त्याने आरोळ्या मारायला सुरुवात केली. त्यामुळे तेथे असलेले गावकरी व पोलिसांनी या चोरटयाला मोठ्या शिताफिने पकडले. आरोपी बारोलीकडून मोबाईल जप्त करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करीत आहे.