Home क्राईम मोबाईल चोरास २४ तासात मुद्देमालासह अटक

मोबाईल चोरास २४ तासात मुद्देमालासह अटक

0
37

जळगाव प्रतिनिधी । शहरातील गोलाणी मार्केटमधील माऊली मोबाईल या दुकानातून काल रात्री चोरी करण्यात आलेल्या एक लाख ६५ हजार ४०० रुपयांच्या १३ मोबाईलसह चोरट्यास आज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

अधिक माहिती अशी की, या चोरी प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आल्यानंतर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरु असताना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार तालुक्यातील डोमगाव येथील एका शेतातून संशयित आरोपी स्वप्नील ज्ञानेश्‍वर पाटील (वय-२४) यास चोरीच्या १३ मोबाईलसह ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडून आणखी काही चोर्‍या उघड होण्याची शक्यता आहे. पुढील तपास पो.उ.नि. राजकुमार हिंगोले व पोलीस नाईक विकास महाजन हे करीत आहेत.

आरोपी स्वप्नील ज्ञानेश्‍वर पाटील


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound