जळगाव प्रतिनिधी । जळगाव औरंगाबाद रोडवर उभ्या ट्रकमध्ये बसलेल्या एकाच्या हातातून मोबाईल हिसकावून दुचाकीवरून पळ काढणाऱ्या दोघांपैकी एकाला दुचाकीसह अटक करण्यात आली आहे. तर एक फरार झाला आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
याबाबत माहिती अशी की, मुकेश हजारे अजनारे (वय 21) रा. ताराबावडी ता. भगलपूरा जि. खरगोन (म.प्र) हा ट्रक क्लिनर असून 25 जुलै रोजी रात्री 1 वाजेच्या सुमारास जळगाव औरंगाबाद रोडवरील मारूती शोरूम समोर सोगर लेन्टींल्स कंपनीच्या समेार ट्रक क्रमांक एमएच 18 बाजी 6371 ट्रकच्या कॅबीनमध्ये मोबाईलमध्ये पिक्चर पाहत होता. याचवेळी संशयित आरोपी गोविंदा रविंद्र बाविस्कर (वय 29) रा. श्रीराम नगर भुसावळ आणि गणेश बाबुरा बाविस्कर (कोळी) रा.कडगाव ता. भुसावळ हे दुचाकी क्रमांक एमएच 14 ईजी 5155 ने येवून आरोपी गोविंदाने मुकेशच्या हातातील पाच हजार रूपये किंमतीचा मोबाईल हिसकावून पळत असतांना त्याचा पाठलाग केला. या दुचाकी स्लिप होऊन दोघे खाली पडले. यात गोविंदा बाविस्कर याला दुचाकीसह एमआयडीसी पोलीसांच्या ताब्यात दिले. तर दुसरा आरोपी गणेश बाविस्कर हा फरार झाला आहे. या प्रकरणी दोघांविरोधात एमआयडीसी पोलीसात मुकेश अजनारे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी हे सराईत गुन्हेगार, अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता
सदर झालेल्या प्रकाराबाबत माहिती मिळताच रात्र गस्तीला असलेले पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे, हेमंत कळसकर, असीम तडवी, नरेंद्र सोनवणे, पोलीस चालक रवींद्र चौधरी अशांनी लागलीच घटनास्थळी पोहोचून अटक आरोपी यांच्याकडून गुन्ह्यातील चोरलेला मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. दुसरा आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला असून पोलिसांच्या सतर्कतेमुळे सदरचा गुन्हा लागलीच उघडली झालेला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रमेश वावरे, रतिलाल पवार करीत आहेत. सदरचे आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांचेवर यापूर्वी देखील अशाच प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.