नवी दिल्ली वृत्तसंस्था । मोबाइल ग्राहकांना रिचार्जसाठी दुप्पट किंमत द्यावी लागणार आहे. भारती एअरटेलचे चेयरमन सुनील मित्तल आगामी टॅरिफ महाग केला जाण्याचे संकेत देत म्हणाले की, ग्राहकांना जास्त किंमत मोजावी लागू शकते. सध्या एखादा ग्राहक महिन्याला ४५ रुपये देत असेल तर त्याला लवकरच १०० रुपये मोजावे लागू शकतात.
ग्राहकांना १६० रुपयात १.६ जीबी डेटा मिळू शकतो किंवा त्यापेक्षा जास्त किंमत देण्यासाठी तयार राहावे लागू शकते. मित्तल यांनी सांगितले की, आम्हाला यूएस किंवा यूरोपसारखे ५० किंवा ६० डॉलर नाही पाहिजे. परंतु, १६० रुपयांत १६ जीबी डेटा प्रति महिना देणे हे जास्त दिवस चालणारे नाही. १० रुपयात मिळणाऱ्या १ जीबी डेटासाठी जास्त पैसे मोजावे लागतील.