Home क्राईम बसमध्ये चढताना एकाचा मोबाईल लांबविला

बसमध्ये चढताना एकाचा मोबाईल लांबविला


mobilechorirp

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील उमाळा येथील जिल्हा न्यायालयात कार्यरत शिपाई सचिन जयराम ससाणे वय 26 या यांचा बसमध्ये चढतांना गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी 15 हजार रुपयांचा मोबाईल लांबविल्याची घटना 9 रोजी सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास नवीन बसस्थानकात घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

उमाळा येथे तरुण सचिन ससाणे हा जिल्हा न्यायालयात शिपाई म्हणून कार्यरत आहे. ते रोज बसने उमाळा येथून जळगावला ये-जा करतात. 9 रोजी ड्युटी आटोपल्याने ते घराकडे जाण्यासाठी सायंकाळी 7.30 वाजता नवीन बसस्थानकात आले. याठिकाणी जळगाव-जामनेर बस उभी होती. या बसमध्ये बसले. बसल्यावर त्यांना पॅन्टच्या खिशातील मोबाईल गायब असल्याचे लक्षात आले. त्यांनी शोधाशोध केली मात्र मिळून आला नाही. अखेर त्यांनी शुक्रवारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound