Home क्राईम चोरट्यांकडून तीन मोबाइल हस्तगत

चोरट्यांकडून तीन मोबाइल हस्तगत

0
28

रावेर प्रतिनिधी । रावेर पोलिसांनी मोबाईल चोरट्यास गजाआड केले असून त्याच्याकडून चोरीचे तीन मोबाईल हँडसेट जप्त करण्यात आले आहेत.

या बाबत वृत्त असे की, पराग वाडोदकर वय – ४८, जयश्री खानचंदानी वय – ३०, विजय पाटील वय ४७ सर्व रा रावेर यांनी मोबाईल हँडसेट चोरीवरून दिलेल्या फिर्यादीवरून अहिरवाडी येथून प्रदिप तायडे वय – २२ संदिप ऊर्फ बिल्ला गोमाटे वय – २२ यांना अटक करण्यात आले होते. त्यांना भादवी क्र. ३९२, ३४ प्रमाणे अटक केली होती. न्यायालयाकडून पोलिस कोठडी रिमांड घेवून त्यांच्याकडून १)तिन हजार रुपये किमतीचा सैमसंग कंपनीचा मोबाईल २)सात हजार रुपये किंमतीचा संमसंग कंपनीचा मोबाइल ३)पाच हजारे रुपये कीमतीचा विवो कंपनीचा मोबाईल जप्त करण्यात आलेला आहे. तसेच या आरोपींकडून टेक्नो कंपनीचा मोबाईल आरोपी कडून हस्तगत करणे बाकी आहे. या आरोपींना जिल्हा कारागृहात पाठवले असुन गुन्हयांचा तपास पोलीस निरीक्षक आर . बी . वाकोडे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि शिवाजी पाळदे, पोलीस उप निरीक्षक अमृत पाटील, पो . कॉ . विकास पहुरकर, भरत सोपे, जाकीर पिंजारी, सुरेश मेढे, नरेंद्र बाविस्कर हे करीत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound