जळगाव (प्रतिनिधी) येथील शिवकॉलनी मधील भाडे कराराने राहणाऱ्यां राजेश शिंद, , राजविर विलास देशमुख, शुभम पांडे यांचे महागडे मोबाईल चोरीस गेल्याचे घटना रात्री घडली आहे. शहरात चोरीचे सत्र सुरूच आहे. शिवकॉलनी येथे मातोश्री, गट नं ५५ प्लॉट नं २७/१ हा प्लॉट चंद्रशेखर भांडारकर यांच्या मालकीचे असून त्यानी हे रुम विद्यार्थी व MR लोकांनसाठी भाड्याने दिले आहेत. या रूममध्ये ७ लोक राहतात रात्री ३ ते ४ च्या दरम्यान ४ महागडे मोबाईल चोरीस गेले आहेत.
यात POCO F1 २४००० रुपये, MI १४९९९ रुपये, MI 5 PRO ९९९९ रुपये, कार्बन कंपनी चा ३००० रुपयांचा मोबाइल व ५००० हजार रोकड चोरट्यांनी लंपास केले आहे. रात्री लाईट गेल्यामुळे दरवाजे उघडे करून झोपले होते. काही दिवसा पूर्वी यांच्याच बाजूला राहणारे पोलीस कॉन्स्टेबल यांच्या हि घरून मोबाईल व पाकीट चोरी गेले होते. चोरट्यांनी राजेश शिंद मूळ राहणार रावेर मार्केटिंग MR असून यांचा POCO F1 या कंपनी चा २४००० हजार रुपयांचा मोबाइल, राजविर विलास देशमुख SSBT कॉलेज इंजिनियरिंगचा विद्यार्थी लास्ट इयरला आहे. आज त्याचा लास्ट इयर चा पहिला प्रॅक्टिकल पेपर होता. मात्र, चोरट्यांनी हॉल तिकीट व मोबाईल आणि सर्व कागदपत्र चोरून नेले म्हणून आज पेपरला जाऊ शकले नाही. शुभम पांडे MR असून यांचा हि MI 5PRO मोबाइल आणि एक कारबन कंपनीचा मोबाइल चोरट्यांनी नेले आहे.