Home क्राईम मोबाईल चोरीप्रकरणी अल्पवयीन चोरटा एलसीबीच्या ताब्यात

मोबाईल चोरीप्रकरणी अल्पवयीन चोरटा एलसीबीच्या ताब्यात

crime-2

crime 4 3

जळगाव प्रतिनिधी । भडगाव तालुक्यातील कोळगाव येथील एका मोबाईल चोरी प्रकरणी भडगाव पोलीसात दाखल असलेल्या गुन्ह्यात एका अल्पवयीन चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भडगाव तालुक्यातील कोळगाव येथील नितीन सुपडू पाटील वय 35 हे मेडीकल चालक आहे. 30 एप्रिल 2019 रोजी दुपारी 2 ते 2.15 वाजेच्या दरम्यान घरी जेवणासाठी आले असता त्यांच्या घरातील सोफ्यावर ठेवलेला मोबाईल अज्ञात चोरट्याने चोरून नेला होता. याप्रकरणी नितीन पाटील यांच्या फिर्यादीवरून भडगाव पोलीसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान या गुन्ह्यातील मोबाईल धरणगाव येथील मुलास गिप्ट म्हणून मिळालेला आहे अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर एलसीबीचे पथकाने धरणगाव येथे जावून चौकशी केली. मोबाईल गिप्ट मिळालेल्या मुलाची चौकशी केली असता तो इयत्ता अकरावीत शिकणारा विद्यार्थी आहे. त्याच्या जवळून चोरी केलेला मोबाईल हस्तगत करून अल्पवयीन मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतले असल्याचे कळते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound