जळगाव प्रतिनिधी । शहरातील सुरेशदादा जैन नगरात घराच्या गॅलरीचा दरवाजा उघडा असलेल्याचा फायदा घेत चोरट्यांनी घरातून दोन मोबाईल लंपास केले होते. याप्रकरणातील फरार असलेले दोघी आरोपींना अटक केली आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेशदादा जैन नगरातील रहिवासी सचिन जगन्नाथ महाजन (वय-३१) हे दि. 23 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 12:30 वाजेच्या सुमारास पाणी पिण्यासाठी उठले होते. त्यावेळेस त्यांनी घराच्या गॅलरीचा दरवाजा उघडाच ठेवला होता. याचीच संधी साधत चोरट्यांनी घरात प्रवेश करत किचनमध्ये ठेवलेला 8 हजार रुपये किमतीचा मोबाईल लंपास केला आहे. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार वासुदेव सोनवणे, हवालदार विजय निकुंभ, पोलीस नाईक अक्रम शेख, गणेश शिरसाळे, पोलीस कॉन्स्टेबल सुधीर साळवे, रतन गिते आणि सचिन वाघ यांनी गुप्त माहिती मिळवत गेंदालाल मील परिसरात सापळा रचण्यात आला असून नईम शहा मोहम्मद शहा (वय-२२) व इरफान हैदर खान (वय-३०) या दोघांना अटक करण्यात आली आहे. दोघांची चौकशी केल्यास त्यांच्याकडून चोरलेले २ मोबईल जप्त करण्यात आले आहे.