शाळा व्यवस्थापनासाठी गट शिक्षणाधिकाऱ्यांना यांना मनसेचे निवेदन.

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या देखभाल दुरुस्ती व्यवस्थापनासाठी गट शिक्षण अधिकाऱ्यांना  मनसेतर्फे निवेदन देण्यात आले.

गेल्या २०१९ ते २०२१ या कालावधीत कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद करण्यात आल्या होत्या. दुरस्त शिक्षणाचा विद्यार्थ्यांवर परिणाम झाला असून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळेत जाण्याची गोडी लागावी यासाठी शाळा व्यवस्थापन यांनी शाळेत तशी वातावरण निर्मिती करणं गरजेचं आहे.

सुंदर व निरोगी करण्यासाठी तालुक्यातील सर्व शाळांना रंग रंगोटी, पावसात कौल, स्लॅब, पत्रे गळत असेल ती दुरुस्ती, वृक्षारोपण, शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय, मुलांना शाळेत येण्यासाठी शालेय उत्तम भोजन, युनिफॉर्म, शौचालये, स्वच्छता, शालेय पुस्तके, निरोगी जीवन जगण्यासाठी शिक्षकाने दररोज २० मिनिट विद्यार्थीसहित किटाणू स्वच्छता प्रात्यक्षिक, उत्तम प्रकारचे शिक्षण देणे गरजेचे आहे.

जेणेकरून विद्यार्थ्यांना शिक्षणाची, शाळेची गोडी लागेल. यासाठी शाळांनी प्रयत्न करायला हवेत. यासाठी मनसे तालुका अध्यक्ष मधुकर भोई, मंगेश कोळी, श्रीराम भोई, निखिल झनके, गणेश धनगर, मुकेश झाल्टे, सुनील कोळी आदी मनसे सैनिकांनी मुक्ताईनगर गट शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

Protected Content