दीपनगर प्रकल्पासमोर मनसेचे निदर्शने

भुसावळ प्रतिनिधी । दिपनगर विद्युत प्रकल्पात स्थानिक बेरोजगार तरुणांना डावलून परप्रांतीयांना काम दिली जात आहे. तर स्थानिक तरुण रोजगारासाठी दारोदार भटकंती करीत आहे. त्यामुळे यापुढे 660 मेगावॅट प्रकल्पात स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराच्या संधी देण्यात यावी, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज प्रकल्प समोर निदर्शने करण्यात आली.

दीपनगर औष्णिक विज निर्मित केंद्रातील 660 मेगावॉट प्रकल्पात स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराची संधी मिळावी, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण विज कामगार सेना यांनी दिपनगर प्रशासनाला निवेदन दिले होते. यानंतर आज प्रकल्पासमोर घोषणाबाजी करून स्थानिक तरुणांना रोजगार देण्याची मागणी केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आक्रमक भूमिकेची दखल घेत, दिपनगर प्रशासनाच्यावतीने मनसेच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा करण्यात आली. यावेळी मुख्य अभियंता विवेक रोकडे व मुकेश मेश्राम यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. 660 प्रकल्पात काम करत असलेल्या कंपन्याचे प्रकल्प व्यवस्थापक उपस्थित होते. येत्या दोन दिवसांत भरती प्रक्रिया सुरवात करून, स्थानिक भूमिपुत्रांना कुशल/अकुशल/अर्धकुशल या प्रमाने कामं देन्यात येईल असे आश्वासन दिपनगर प्रशासनाच्या वतीने देण्यात आले. आजच्या चर्चेला भुसावळ मनसे शहराध्यक्ष  विनोद पाठक व महिला शहरप्रमूख रीना साळवी, यावल शहरप्रमुख व महाराष्ट्र नवनिर्माण विज कामगार सेना अध्यक्ष मनीष चवरे, उपाध्यक्ष सुरेश कांबळे उपस्थिती होते.

 

Protected Content