पुण्यात उद्या मनसेची सभा

Raj Thackeray

 

पुणे प्रतिनिधी । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रचाराला राज ठाकरे यांच्या सभेने उद्यापासून प्रारंभ होणार आहे. येथील सरस्वती मंदिर मैदानात संध्याकाळी सहा वाजता सभेस सुरुवात होणार आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी मनसे उमेदवारांच्या प्रचारासाठी पक्षाकडून १ ऑक्टोबर रोजी जिल्हा प्रशासनाला पत्र देण्यात आले होते. टिळक रस्ता आणि शनिवार पेठेतील रमणबाग शाळेतील मैदान सभेसाठी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी या पत्रातून करण्यात आली होती. मात्र सभेला परवानगी नाकारण्यात आली. त्यानंतर बुधवारी (९ ऑक्टोबर) सरस्वती विद्या मंदिरच्या मैदानासाठी मनसेकडून अर्ज करण्यात आला. मात्र मैदान उपलब्ध करून देणे अडचणीचे असल्याचे सांगण्यात आले. निवडणूक शाखेकडे मनसेकडून पुन्हा पत्रव्यवहार करण्यात आला. त्यानंतर सरस्वती मंदिरचे मैदान मनसेला उपलब्ध झाले आहे. त्यामुळे बुधवारी सायंकाळी सहा वाजता राज ठाकरे यांची पुण्यातील उमेदवारांसाठीची सभा होईल. या सभेच्या निमित्ताने मनसेच्या प्रचारालाही सुरुवात होणार आहे. या ‘राज’गर्जनेच्या माध्यमातून मनसे पुण्यातील विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहे.

Protected Content