मुंबई (वृत्तसंस्था) कोहिनूर स्क्वेअरप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या चौकशीनंतर ईडीने मनसेचे नेते माजी आमदार नितीन सरदेसाई यांची आज सकाळपासून चौकशी सुरू केली आहे.
कोहिनूर मिलप्रकरणी राज ठाकरे, माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते मनोहर जोशी यांचे सुपुत्र उन्मेश जोशी तसेच मनसे नेते आदित्य शिरोडकर यांचीही ईडीकडून चौकशी करण्यात आली. त्यानंतर आज ईडीने सरदेसाई यांना चौकशीसाठी बोलावले होते. त्यानुसार सरदेसाई हे ईडीच्या कार्यालयात हजर झाले आहेत. २२ ऑगस्टला राज ईडीच्या कार्यालयात हजर झाले होते. ईडीच्या अधिकाऱ्यांनी जवळपास आठ तास राज यांची चौकशी केली होती. आता याच प्रकरणात मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांची ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे.