Home Cities पाचोरा किरीट सोमय्यांच्या शारीरिक व्यंगावर टीका करणाऱ्या आमदाराचा निषेध – अमोल शिंदे

किरीट सोमय्यांच्या शारीरिक व्यंगावर टीका करणाऱ्या आमदाराचा निषेध – अमोल शिंदे

0
31

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भाजपाचे जेष्ठ नेते किरीट सोमय्या यांच्या शारीरिक व्यंगावर टीका करणाऱ्या पाचोरा येथील शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांचा भाजपाचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी जाहीर निषेध व्यक्त केला.

शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाच्या निमित्ताने सुरू असलेल्या जाहीर भाषणात पाचोरा येथील शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष व जेष्ठ नेते किरीट सोमय्या यांना “बोबडा” संबोधून त्यांच्या शारीरिक व्यंगावर जाहीर टीका केली आहे. एवढ्यावरच न थांबता त्यांनी पत्रकारांना खुलासा करतांना आपल्या असंस्कृत प्रवृत्तीचे जाहीर समर्थन करून “होय मी बोबडा बोललो” असे निर्लज्जपणाने कबूल केलेले आहे. असे भाजपाचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी बोलतांना सांगितले.

तसेच भाजपाचे जेष्ठ नेते किरीट सोमय्या यांच्या शारीरिक व्यंगावर टीका करणाऱ्या पाचोरा येथील उथळ प्रवृत्तीच्या व बेगडी प्रसिद्धीचा हव्यास असणाऱ्या आमदाराचा भारतीय जनता पार्टी पाचोरा-भडगाव तर्फे जाहीर निषेध करीत आहोत असे वक्तव्य केले.

आमदाराने भाजपाचे जेष्ठ नेते किरीट सोमय्या व समाजातील तमाम दिव्यांग व शारीरिक व्यंग असलेल्या जनतेची जाहीर माफी मागावी. अशी मागणी देखील भारतीय जनता पार्टी पाचोरा-भडगावच्या वतीने अमोल शिंदे यांनी केली आहे.


Protected Content

Play sound