कोलकाता वृत्तसंस्था । पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीआधी तृणमुलच्या आमदाराने राजीनामा दिला असून ते भाजपमध्ये दाखल होणार असल्याचे स्पष्ट आहे.
पश्चीम बंगालमधील ज्येष्ठ नेते तथा तृणमूल काँग्रेसचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी आज आमदारकीचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यानं बंगालच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. या पाठोपाठ त्यांनी आमदारकी सुध्दा सोडली असून ते भाजपमध्ये दाखल होणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पुढील काही दिवसात अधिकारी भाजपात दाखल होणार असल्याचं बोललं जात आहे. दुसरीकडे भाजपाकडून पक्षात प्रवेश करण्यासाठी नेत्यांवर दबाव आणला जात असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसकडून करण्यात आला आहे. अधिकारी यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपानं त्याचं स्वागत केलं आहे. त्याचबरोबर त्यांना भाजपात येण्याचंही आवाहनही केलं आहे.