पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सद्यस्थितीत महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीचा बिगुल लवकरच वाजणार आहे. या अनुषंगाने विरोधकांकडुन होत असलेल्या आरोप प्रत्यारोप या विषयांना पुर्णविराम देत पाचोरा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांनी सन – २०१९ ते आज पावेतो केलेल्या त्यांच्या विकास कामांचा शहरातील भडगाव रोडवरील अटल मैदान येथे ७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजित भव्य निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास पंचायतराज व पर्यटन मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय राज्य मंत्री रक्षा खडसे, खा. स्मिता वाघ, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आ. किशोर पाटील हे आढावा सादर करणार आहेत. या मेळाव्यात जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन पाचोरा मतदार संघाचे विद्यमान आमदार किशोर पाटील यांनी तमाम जनतेला केले आहे.