पाचोरा, प्रतिनिधी | आमदार किशोर पाटील यांच्या प्रयत्नांनी झालेल्या विकास कामांचे लोकापर्ण, मंजूर विविध विकास कामांचे भूमिपूजन, शिवसेना – युवासेना शाखा फलक अनावरण वडगाव आंबे, वडगाव जोगे, कोकडी, वडगाव आंबे, तांडा नं. १ व २ सावखेडा आदी गावांमध्ये आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते अतिशय उत्साहात पार पडले.
‘आमदार आपल्या गावी’ चा ‘जन आशीर्वाद अभियाना’नंतर्गत आमदार किशोर पाटील यांनी आमदारफंड, मूलभूत २५१५, अर्थसंकल्प, डी.पी.डी.सी, जलयुक्त शिवार, राष्ट्रीय ग्रामीण पाणी पुरवठा पेयजल योजना, तीर्थ क्षेत्र विकास योजना, तांडा वस्ती सुधार योजना, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आदी विविध फंडातून निधी उपलब्ध करून गेल्या ४ वर्षातील प्रत्येक गावामध्ये केलेल्या विकासकामांची गावातील सरपंच, उपसरपंच, सदस्य, वि. का. सो. चेरमन, व्हा. चेरमन, संचालक मंडळ, जेष्ठ शिवसैनिक, शेतकरी बांधव, युवावर्ग जि.प. गटातील शिवसेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधीना यांच्या समवेत झालेल्या बैठकीत माहिती दिली.भविष्यात आपल्या गावासाठी काय केले पाहिजे अशी विचारणा करून ग्रामस्थांच्या अडी – अडचणी समस्या, प्रश्न समजून घेतले. व तातडीने संबंधित अधिकाऱ्यांशी भ्रमनधवनीवरून संपर्क साधून समस्यांचे निराकारण करण्यात आले. याप्रसंगी दिनकर देवरे यांनी प्रस्तावित केले तर नाना वाघ यांनी संचालन केले. बैठकीस गणेश पाटील, शरद पाटील, अरुण पाटील, दिपकसिंग राजपूत, भैय्या पाटील, दिनकर गीते, भगवान राठोड, अधिकार पाटील व प्रत्येक गावातील सरपंच, उपसरपंच,सदस्यगन , चेरमन, व्हा. चेरमन, संचालक मंडळ, शाखाप्रमुख, उपशाखा प्रमुख आदी उपस्थित होते.