चाळीसगाव, प्रतिनिधी । माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आ. मंगेश चव्हाण यांनी चाळीसगाव शहरातील रिक्षाचालकांना रिक्षात बसवण्यासाठी प्लास्टिक कव्हर्सचे वाटप करण्यात आले होते.
कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर शहरातील रिक्षाचालकांनी रिक्षात प्लास्टिकचे कव्हर्स बसवलेले नसल्याने वाहतूक शाखेकडून दंडात्मक कारवाई करण्यात येत होती. मात्र आमदार मंगेश चव्हाण यांनी माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शहरातील रिक्षाचालकांना प्लास्टिकचे कव्हर्स वाटप करून माणूसकीचा संदेश दिला आहे. कोरोनाच्या काळात रिक्षाचालकांचे अक्षरशः हाल झाले आहे. आर्थिक गणित बिघडल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यात रिक्षात प्लास्टिकचे कव्हर्स नसल्याने शहरातील ५० रिक्षांवर वाहतूक शाखेने कारवाई करून जमा केले आहे. सदर रिक्षाचालकांनी आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडे आपली कैफियत मांडली. त्यावर लागलीच आमदार मंगेश चव्हाण यांनी स्वखर्चाने प्लास्टिकचे कव्हर्स मागवून शहरातील रिक्षाचालकांना वितरीत केले. तसेच ५० रिक्षांवर कारवाई करण्यात आलेल्या रिक्षांना सोडण्यात आले. यावेळी वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक प्रकाश सदगीर, भाजपा तालुका उपाध्यक्ष भैय्यासाहेब पाटील, नगरसेवक भास्कर पाटील, सरचिटणीस योगेश खंडेलवाल, कैलास नाना पाटील, राहुल पाटील, संता पैलवान, अनिल कापसे व रिक्षाचालक उपस्थित होते.