सर्व नुकसानग्रस्तांना बाधित क्षेत्रानुसार भरपाई मिळावी : आ.चंद्रकांत पाटील

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अतिवृष्टीने बाधीत झालेल्या शेतकर्‍यांना बाधीत क्षेत्रानुसार भरपाई मिळावी अशी मागणी आमदार चंद्रकांत पाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, मुक्ताईनगर मतदार संघात दि.२७ एप्रिल २०२३ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे कांदा उत्पादक शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झालेले होते. यात त्यावेळी नुकसान भरपाई मिळणे कामी पंचनामे होऊन प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आलेले होते. त्यानुसार शेतकर्‍यांना प्रति हेक्टरी रु.१७,०००/-, रु.८,५००/- रु ३४००/- अशा वेगवेगळ्या रकमा तफावती नुसार नुकसान भरपाई पोटी शासनाने मंजूर केलेल्या आहेत. परंतु बाधित क्षेत्र सारखे असतांना मिळणार्‍या नुकसान भरपाईच्या रकमेत मात्र प्रचंड तफावत आहे. त्यामुळे शेतकर्‍याचा प्रचंड रोष आहे.त्यामुळे याप्रकरणी योग्य ती चौकशी करण्यात यावी व सर्व शेतकर्‍यांच्या बाधित क्षेत्राप्रमाणे योग्य तो मोबदला देण्यात यावा अशी मागणी आ. चंद्रकांत पाटील यांनी जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद यांना दिलेल्या लेखी पत्रात केली आहे.

आमदार चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी या संदर्भातील निवेदन जिल्हाधिकार्‍यांना प्रदान केले. यावेळी शिवसेनेचे विधानसभा क्षेत्र प्रमुख सुनील पाटील, उपतालुकाप्रमुख नवनीत पाटील, प्रशांत पाटील (रेंभोटा), गोपाल पाटील (रुईखेडा), सुधीर कुलकर्णी (अंतुर्ली), गजानन पाटील ( सुकळी), मजीद खान (बेलसवाडी) शांताराम पाटील , कृष्णा पाटील , गोपाळ पाटील , श्री.अग्रवाल आदिंची उपस्थिती होती.

Protected Content