आमदार अनिल पाटील यांच्याकडून १५ लाखांच्या निधीची घोषणा

अमळनेर प्रतिनिधी । सकल धनगर समाज प्रतिष्ठान या स्वयंसेवी संस्थेस शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांसाठी अमळनेर नगरपरिषदेने खुल्या भूमीचा भूखंड दिला आहे. यावेळी आमदार अनिल पाटील यांनी १५ लाख रुपयांच्या निधीची घोषणा केली.  राजे मल्हारराव होळकर आणि राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या विचारांच्या प्रसारासाठी खुल्या भूखंडाचा विकास केला जाईल.

यावेळी नगर परिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, पालिकेच्या मुख्याधिकारी डॉ.विद्या गायकवाड व माजी आमदार  साहेबराव पाटील यांनी लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता साहेबराव पाटील यांचा वाढदिवस केक कापुन साजरा करण्यात आला. या प्रसंगी प्रा.अशोक पवार, संदीप घोरपडे, माजी नगरसेवक, प्रतिष्ठानचे अध्यक्ष बन्सिलाल भागवत, अमळनेर स्कुल बोर्ड अध्यक्ष नितीन निळे, उपाध्यक्ष मच्छिद्र लांडगे, सचिव एस.सी.तेले,  प्रभाकर लांडगे, संघटक प्रदीप कंखरे, खजिनदार प्रा.जी. एल. धनगर,  प्रा.दिनेश भलकार,  प्रा.आर.पी.धनगर, तुषार इधे, आनंदा हडपे, पंकज धनगर, रमेश शिरसाठ, प्रा.जगदीश भागवत, समाधान भागवत, सुधाकर पवार, गोपीचंद शिरसाठ, दिलीप ठाकरे, सुरेश धनगर, ए.बी.धनगर, योगेश धनगर, बापु धनगर, आर.के.हडपे, गणेश शिंगारे, विशाल देवरे, रविंद्र धनगर, सुनिल धनगर, राहूल धनगर, गणेश शिरसाट, प्रितम रत्नपारखे प्रा दीपक पवार आदी उपस्थित होते.

 

Protected Content